अमरावती,दि.31: महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याचा अजित पवारांचे भाकीत वर्तवलेल्या आमदाराने दावा केला आहे. अजित पवारांबाबत केलेला दावा खरा ठरला आहे. राम मंदिराच्या या लोकार्पणानंतर महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होईल, असे संकेत आमदार रवी राणा यांनी दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. राम मंदिर लोकार्पणानंतर आणखी दोन पक्ष भाजपला पाठिंबा देतील आणि राज्यात विरोधात एकच पक्ष शिल्लक राहील, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.
यापूर्वीही रवी राणा यांनी शिवसेना पक्षातील फूट व अजित पवार सरकारमध्ये सामील होतील असे केलेले दावे खरे ठरले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी करत आहेत. जागावाटपावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. अशातच राणा यांनी मोठा दावा केला आहे.
रवी राणा यांचा मोठा दावा
‘जे सक्रीय पक्ष आहेत, त्यातले दोन पक्ष कमी होतील आणि हे दोन पक्ष मोदीजींना पाठिंबा देतील. एकच पक्ष भाजपविरोधात दिसेल. भगवान रामाला प्रार्थना करणार आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रात मोठा चमत्कार होईल. आघाडीतले दोन पक्ष कमी होतील आणि एकच राष्ट्रीय पक्ष आहे तो राहील,’ असं रवी राणा म्हणाले.
अशोक चव्हाण काय म्हणाले?
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी रवी राणा यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. अशी सुतराम शक्यता नाही, ज्याअर्थी ते असं बोलतायत याचा अर्थ त्यांना त्यांच्या विजयाची खात्री नाही. तीनही पक्षात वाद लागावेत या अनुशंगाने काहीतरी सुरू आहे. आमच्यात काय विषय आहे, त्यांना काय माहिती आहे? असा सवाल अशोक चव्हाण यांनी विचारला आहे.