सोलापूर,दि.4: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी येत्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरू प्रसंगी सभागृहाचे काम चालू देणार नाही, असा शब्द आमदार प्रणिती शिंदे यांनी जुळे सोलापूर मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिला.
जुळे सोलापूर मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेटून निवेदन दिले. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली असता, मी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडणार असून प्रसंगी सभागृह चालू देणार नाही असे प्रणिती शिंदेंनी शिष्टमंडळाला सांगितले आहे.
या शिष्टमंडळात राजाभाऊ कुसेकर प्रशांत बाबर नामदेव पवार चेतन चौधरी सचिन गोडसे शशिकांत शिंदे सिताराम बाबर नागेश शिंदे श्याम कदम आदी उपस्थित होते.