MLA Jai Krishna Patel | ACBने लाचप्रकरणात आमदार जयकृष्ण पटेल यांना केली अटक 

0
MLA Jai Krishna Patel

मुंबई,दि.५: MLA Jai Krishna Patel Bribery Case |  ACBने लाचप्रकरणात आमदार जयकृष्ण पटेल यांना अटक केली आहे. एकेकाळी भ्रष्टाचाराविरोधात पोस्टर घेऊन आंदोलन करणारे आमदार पटेल यांनाच आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ते भारत आदिवासी पार्टीचे आमदार आहेत. राजस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आमदाराला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पटेल यांनी शिक्षकाची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. लाचखोरीच्या प्रकरणात अडकले तेव्हा त्यांनी त्यांचा ११ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. गेल्या वर्षी ४ जून रोजी ते आमदार झाले आणि यावर्षी ४ मे रोजी त्यांना अटक करण्यात आली. 

MLA Jai Krishna Patel Bribery Case
MLA Jai Krishna Patel Bribery Case

३ एप्रिल २०२४ रोजी पोटनिवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात जय कृष्ण यांनी त्यांची एकूण मालमत्ता १.५ लाख रुपये असल्याचे घोषित केले होते, ज्यामध्ये चांदरवाडा एसबीआय शाखेत ५०० रुपये, बांसवाडा येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेत ५०० रुपये, ५० हजार रुपये रोख आणि ३५ हजार रुपयांचे चांदीचे दागिने यांचा समावेश होता. त्याच्या नावावर वाहन म्हणून सायकलही नव्हती. शेतीतून मिळवलेल्या या मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली.

बेकायदेशीर खाणकामासाठी ते खाण माफियांना दोष देत असे, सरकार त्यांना संरक्षण देतेय असा आरोप आमदार सातत्याने करायचे. परंतु त्याच आमदारांना खाण माफियांकडून कोट्यवधीची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. जयकृष्ण पटेल पहिल्यांदा आमदार बनलेत आणि राजस्थानच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आमदाराला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here