आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत एसटीच्या विलीनीकरणासाठी करणार आमरण उपोषण

20 डिसेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Strike ) राहिलेल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उपोषण करणार

0

मुंबई,दि.11: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) एसटीच्या विलीनीकरणासाठी आमरण उपोषण करणार आहेत. MLA Gopichand Padalkar and Sadabhau Khot will go on a fast for the merger of ST महाविकास आघाडी सरकार काळात एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणासाठी आंदोलन केले होते. गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) येत्या 20 डिसेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Strike ) राहिलेल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी दोन्ही आमदार उपोषण करणार आहेत, अशी माहिती सेवा शक्ती संघर्ष एस. टी . कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सतिश मेटकरी यांनी दिलीय.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारला होता बेमुदत संप

गेल्या वर्षी 29 ऑक्टोबर 2021 पासून जवळपास सहा महिने एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती. यावेळी हे प्रकरण कोर्टात देखील गेलं. ठाकरे सरकारने त्यावेळी कर्मचाऱ्यांना पागारवाढ करण्यासाह अनेक मागण्या मान्य केल्या. परंतु, मान्य झालेल्या मागण्यांमधील अनेक मागण्यांची अंमबजावणी अद्याप झालेली नाही.

आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत करणार उपोषण

अनेक मागण्यांची अंमबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा उपोषण करण्यात येणार आहे. परंतु, यावेळी हे उपोषण सरकारमधील आमदारच करणार आहेत. आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांची सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघटना एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरणासह इतर मागणीसाठी नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान 20 डिसेंबरपासून आमरण उपोषण करणार आहेत. त्यासाठी त्यांनी पत्र लिहून सरकारकडे परवानगी देखील मागितली आहे.

पत्रात काय म्हटले आहे?

विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात सर्व पक्षीय आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या 18 पैकी 16 मागण्यांवर चर्चा झाली होती. चर्चेनंतर या मागण्या मान्य करण्याचे मान्य झाले होते. परंतु, अद्याप मंजूर झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर, कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत, सरचिटणीस सतीश मेटकरी यांनी शासनाकडे अनेक वेळा या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे. परंतु, यावर पुढे काहीच झालेले नाही. शिवाय सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रीय परिवहन कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहता कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास 19 डिसेंबर 2022 पासून नागपूर शहरात सुरूवात होणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आम्ही आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाभाऊ खोत यांच्याह पदाधिकारी अधिवेशनस्थळी विधानभवनाजवळ आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत 20 डिसेंबरपासून आमरण उपोषण करत आहोत.

ऑक्टोबर 2021 मध्ये पुकारला होता संप

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात संप पुकारला होता. एसटीचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी तब्बल 6 महिने कमचाऱ्यांनी आपला संप सुरू ठेवला होता. यावेळी देखील गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला होता. आंदोलनादरम्यानच राज्य सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी आंदोलनातून काढता पाय घेतला होता. परंतु, आता पुन्हा एकदा आपल्याच सरकारविरोधात दोन्ही नेत्यांनी कंबर कसलीय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here