सोलापूर,दि.३०: MLA Dilip Sopal meets Manoj Jarange Patil शिवसेना (ठाकरे गट) नेते बार्शीचे आमदार दिलीप सोपल (MLA Dilip Sopal) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षण मागणीचा मुद्दा आणखी पुढे येत असून यासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने जाणार आहे.
दिलीप सोपल-मनोज जरांगे पाटील यांची भेट | MLA Dilip Sopal meets Manoj Jarange Patil
बार्शीचे आमदार अॅड. दिलीप सोपल यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. ही भेट तालुक्यात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. (MLA Dilip Sopal-Manoj Jarange Patil News)

बार्शी तालुक्यातील विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी माजी आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती.
निवडणुकीनंतर मराठा आरक्षण मुद्दा मागे पडला. मात्र पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मराठा सोबत घेऊन मुंबईला धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २९ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या या मोर्चासाठी सर्वत्र तयारी सुरू आहे.
आमदार सोपल यांनी दिला शब्द | MLA Dilip Sopal
यातच बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
यावेळी मराठा आरक्षण मागणीचा मुद्दा याकडे आपण लोकप्रतिनिधी या नात्याने सरकारचे लक्ष वेधावे, अशी मागणी करत आमदार सोपल यांना लेखी निवेदनही देण्यात आले. निश्चितपणे याकडे आपण लक्ष वेधू , असा शब्द आमदार सोपल यांनी दिला असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.
यानंतर जरांगे पाटील यांचा आमदार सोपल यांनी सत्कार केला. यावेळी अॅड. विकास जाधव, नंदकुमार काशीद उपस्थित होते.