Mini Lockdown: महाराष्ट्रातील या शहरात मिनी लॉकडाऊन? लवकरच नवीन नियमावली होणार जाहीर

0

देशात कोरोना बाधितांची संख्या (Corona Cases In India) वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्येची (Corona Cases In Maharashtra) नोंद होत आहे.

मुंबई,दि.७: Mini Lockdown In Mumbai: देशात कोरोना बाधितांची संख्या (Corona Cases In India) वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्येची (Corona Cases In Maharashtra) नोंद होत आहे. राज्यात मुंबईत दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत दररोज रुग्णांची संख्या वीस हजारापर्यंत गेल्यास मिनी लॉकडाऊन (Mini Lockdown In Mumbai) लावला जाऊ शकतो असे मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले होते.

काल, गुरुवारी (दि.६) मुंबईत एकाच दिवशी २० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत करोनाची तिसरी लाट अटळ असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. संपूर्ण लॉकडाउन नाही तर, मिनी लॉकडाउन लागू शकतो, अशी दाट शक्यता आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज, शुक्रवारी याबाबतचे संकेत दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. विशेषतः मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. आता मुंबईत २० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज, शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुंबईतील परिस्थितीची माहिती दिली. संपूर्ण लॉकडाउन लागू करणार नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, कठोर निर्बंध अर्थात मिनी लॉकडाउन लावला जाऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले. नवीन निर्बंधांबाबतची नियमावली आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन, मुंबई महापालिका प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. रुग्णालयांतील उपलब्ध खाटांबाबत त्यांनी माहिती दिली. महापालिकेने २२ हजार खाटा आणि ७ हजार आयसीयू बेड्स सज्ज ठेवले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी ३६,२६५ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर एकट्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या २०, १८१ इतकी होती. गुरुवारपर्यंत मुंबईत करोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ही ७९२६० इतकी आहे. ओमिक्रॉनचे राज्यात काल ७९ नवीन रुग्ण आढळले. यातील सर्वाधिक ५७ ओमिक्रॉनबाधित रुग्ण मुंबईतील आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here