Imtiaz Jaleel On Uddhav Thackeray: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक

0

दि.22: Imtiaz Jaleel On Uddhav Thackeray: एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे कौतुक केले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. संवाद साधताना केवळ मुख्यमंत्रीपद नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार असे उध्दव ठाकरे म्हणाले.

शिवसेना आणि बंडखोर आमदार यांच्यात एकमेकांवर आरोपाचे सत्र सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र बंडखोरांना भावनिक साद घातली. आपल्याकडे 46 आमदारांचे समर्थन असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर, शिवसेनेत भूकंप आला. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना मुंबईत भेटून चर्चा करण्याचे आवाहन केले. तसेच, शिवसैनिक आमदारांना हवं असेल तर मी राजीनामा द्यायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केले.

शिवसेनेतील बंडखोर नेत्यांसह एकनाथ शिंदेंनी परत यावे आणि माझ्याशी थेट चर्चा करावी. त्यांना हवं असेल तर मी राजीनामा देईन. दुसरा कोणताही शिवसैनिक मुख्यमंत्री झाला तर मला आनंदच आहे, अशी भावनिक साद उद्धव यांनी शिंदे समर्थक आमदारांना घातली. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी यावर ट्वीट केले. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रामाणिकपणा मला खूपच भावला. आमचे शिवसेनेशी राजकीय किंवा वैचारिक मतभेद आहेत. पण मुख्यमंत्र्यांचे आजचे भाषण ऐकून मला त्यांचे कौतुक करावेसे वाटते. व्वा मुख्यमंत्री जी, तुमच्याबद्दलचा आदर आज अजून वाढला. तुमच्या पक्षातील सर्व बंडखोरांना तुम्ही तुमच्या नम्रपणे चपराक लगावली आहेत”, असे ट्वीट इम्तियाज जलील यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here