राज ठाकरेंच्या वक्तव्यावर MIMने कार्यकर्त्यांना दिला हा आदेश

0

औरंगाबाद,दि.३: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) वक्तव्यावर MIMने कार्यकर्त्यांना प्रतिक्रिया न देण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. महाराष्ट्रातील करोनाचे सर्व निर्बंध कमी झाल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंची सार्वजनिक सभा घेतली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत जोरदार टीका केली.

जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का?: राज ठाकरे

“प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा,” असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनेक पक्षाच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. पण असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षानं मात्र राज ठाकरेंच्या भाषणावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

“राज ठाकरेंच्या भाषणावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना मीच महाराष्ट्रातील आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. सध्या आम्हाला त्यावर काही बोलायचं नाहीय”, असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत. यामागचं कारण विचारलं असता त्यावर आम्ही वेळ आल्यावर बोलू आता काही बोलणार नाही, असा सूचक इशारा देखील जलील यांनी दिला. सध्या मात्र राज ठाकरेंच्या कोणत्याही वक्तव्यावर बोलायचं नाही अशी भूमिका जलील यांनी घेतली आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here