मुंबई,दि.15: हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. अनेक भागांत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर मुंबईत सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या दुर्घटना घडल्या. आता हवामान विभागाने पुन्हा येत्या 24 तासांत अवकाळी पावसाचा इशारा दिला असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
आजही राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. फक्त अवकाळी पाऊसच नव्हे तर वादळी वाऱ्यासह गारपीटही होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या 24 तासांत राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टी म्हणजे मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. ऑरेंज अलर्ट जारी करत हवामान विभागाने तयार राहा, अशी सावधानतेची सूचना केली आहे.