सोलापूर,दि.१: Mehboob Mujawar On Malegaon Blast Case: मालेगाव बॅाम्बस्फोट प्रकरणात ATS चे माजी अधिकारी मेहबूब मुजावर (Mehboob Mujawar) यांनी खळबळजनक दावा केला आहे. गुरुवारी, एनआयएच्या विशेष न्यायालयाने २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना निर्दोष सोडले. आता निवृत्त एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी या प्रकरणावर मोठा खुलासा केला आहे.

गुरुवारी, एनआयएच्या विशेष न्यायालयाने २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना निर्दोष सोडले. आता निवृत्त एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी या प्रकरणावर मोठा खुलासा केला आहे.
मेहबूब मुजावर यांनी सांगितले की मालेगाव स्फोटानंतर तत्कालीन तपास अधिकारी परमवीर सिंह आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश दिले होते.
देशात भगवा दहशतवादाची संकल्पना सिद्ध करण्यासाठी खोटी चौकशी करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले. मुजावर म्हणाले की, मी याचा विरोध केला कारण मला काहीही चुकीचे करायचे नव्हते. पण माझ्यावर खोटे खटले दाखल करण्यात आले. पण या सर्व प्रकरणांमध्ये मला निर्दोष सोडण्यात आले.
मुजावर म्हणाले की त्यांनी माझ्यावर आरोपपत्रात मृतांना जिवंत घोषित करण्यासाठी दबाव आणला. मी नकार दिल्यावर तत्कालीन आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी मला खोट्या प्रकरणात अडकवले. त्यांनी म्हटले की दहशतवाद, भगवा असो किंवा हिरवा, समाजासाठी चांगला नाही. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयावर ते समाधानी असल्याचेही मुजावर म्हणाले.








