एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरांमध्ये बैठक, एकनाथ शिंदे यांनी ठेवल्या 4 अटी

0

दि.21: शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत 4 अटी ठेवल्याची माहिती समोर येत आहे. तत्पूर्वी शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेने कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांना यांना गटनेते पदावरून हटवलं असून त्यांच्याजागी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांना गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या समर्थक आमदारांसह सध्या सूरतमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांचा मुक्कात सूरतमधल्या मेरिडेयन हॉटेलमध्ये असून त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदार उपस्थित आहेत. एकनाथ शिंदे यांचं बंड शमवण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांनी मुख्यमंत्र्याचा निरोप घेऊन सूरतमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यादरम्याची बैठक संपलीय. तब्बल तासभर ही बैठक चालली. या बैठकीत नार्वेकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावावर शिंदेंशी चर्चा केली. आता यावर एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी नार्वेकर यांच्यासमोर अटी ठेवल्याची माहिती मिळतेय.

एकनाथ शिंदे यांच्या चार अटी
– भाजपसोबत गेल्यास शिवसेनेतच राहणार
– काँग्रेस, राष्ट्रवादीशी आघाडी तोडण्याची अट
– काँग्रेस, राष्ट्रवादीवर आमदारांची नाराजी
– भाजपसोबत शिवसेनेने सरकार स्थापन करण्याची मागणी

आता या भेटीनंतर काय होणार? एकनाथ शिंदे यांचं बंड थंड होणार की महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here