Meenatai Thackeray मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला रंग फासण्याचा प्रयत्न

0
स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुतळा

मुंबई,दि.१७: मीनाताई ठाकरेंच्या (Meenatai Thackeray) पुतळ्याला रंग फासण्याचा प्रयत्न. दादरमधील शिवाजी पार्क येथे असणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला रंग फासण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुतळ्याला लाल रंग फासण्याचा काही अज्ञातांनी प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. आता या घटनेमुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. Z 24 तासने याबाबत वृत्त दिले आहे. 

सध्या अनेक शिवसैनिक हे छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी जमा झाले आहेत. काही शिवसैनिक हे या पुतळ्याची साफसफाई करताना दिसत आहे. या घटनेनंतर खासदार अनिल देसाई यांनी पोलीस आणि सरकारी यंत्रणा काय करतेय असा आरोप केला आहे.

दादरमधील शिवाजी पार्क येथे अगदी शिवसेना भवनच्या समोरच मीनाताई ठाकरेंचा अर्धाकृती पुतळा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं घरही पुतळ्यापासून थोड्याशा अंतरावर आहे. या पुतळ्यावर एका अज्ञात व्यक्तीने लाल रंग फासण्याचा प्रयत्न केला असा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे. माहिती मिळताच शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले आणि पुतळ्याची साफसफाई सुरु केली. दरम्यान तणाव निर्माण झाल्याने पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून सुरक्षा वाढवली आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here