डॉक्टर म्हणतात यामुळे रेडिएशनचा प्रभाव होतो कमी
सोलापूर,दि.17: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. व्हिडीओत अनेक प्रकारचे दावे केले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक डॉक्टर गायीचे शेण (cow dung) खाताना दिसत आहे. मनोज मित्तल (Dr. Manoj Mittal) असे या डॉक्टरचे नाव आहे. मनोज मित्तल, कर्नाल (हरियाणा) येथील एमबीबीएस डॉक्टर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ.मनोज मित्तल गोमूत्र पितात आणि शेण खातात. एका चॅनेलशी बोलताना डॉ मनोज मित्तल यांनी शेण खाण्याचे अनेक फायदे सांगितले, तसेच अनेक तर्कवितर्क लावले.
डॉ मनोज मित्तल यांचे म्हणणे आहे की शेणात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन B12 असते, जे रेडिएशनपासून आपले संरक्षण करते. मोबाईल, एसी, फ्रिज हे कळत नाही की ते कोणते रेडिएशन सोडतात, त्यामुळे कॅन्सरसारखा आजार होत आहे, मात्र शेणाचे सेवन केल्यास रेडिएशनचा प्रभाव कमी करता येतो, असे डॉक्टर मनोज सांगतात.
डॉक्टर मनोज मित्तल सांगतात की जर गर्भवती महिलेने प्रसूतीच्या वेळी शेणाचा रस घेतला तर प्रसूती नॉर्मल होण्याची शक्यता असते. एवढेच नाही तर डॉक्टर मनोज मित्तल हे गायीच्या शेणाने अनेक आजार बरे करण्याचा दावा करत आहेत. डॉ मनोज मित्तल हे कर्नालमधील बालरोगतज्ञ डॉक्टर आहेत आणि त्यांचे कर्नालमध्ये स्वतःचे मोठे रुग्णालय आहे.
डॉक्टर मनोज मित्तल यांचा दावा आहे की ते जमिनीवर झोपतात आणि त्यांनी कधीही पंखा किंवा एसी वापरला नाही. डॉ मित्तल सांगतात की गाईच्या शेणात 28 टक्के ऑक्सिजन असते, जे तुमचे आरोग्य चांगले ठेवते.