Sanjay Raut: मायावती आणि ओवेसी यांना भारतरत्न द्यावे लागेल: संजय राऊत

0

दि.11: Sanjay Raut: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी (Assembly Elections Results 2022) पूर्ण झाली असून पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भाजपा सत्तेवर आला आहे हे स्पष्ट दिसत आहे. यामधील सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे लागलं होतं आणि इथे भाजपा पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट आहे. एग्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील हे जवळपास स्पष्ट झालं आहे.

विधानसभा निवडणूका निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी लोकांनी दिलेल्या कौलाचा आदर केला पाहिजे असं म्हटलंय. सर्व विरोधक चर्चा करुन भाजपाला पर्याय देण्याबाबत चर्चा करु असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप आघाडीला 273 जागा मिळाल्या असून बहुमतासाठी 202 जागांची गरज आहे. तर 125 जागा समाजवादी पक्ष आघाडीच्या खात्यात गेल्या आहेत. मोठी गोष्ट म्हणजे मायावतींचा पक्ष बहुजन समाज पक्ष या निवडणुकीत केवळ एक जागा काबीज करू शकला. तर दोन जागा काँग्रेसच्या (Congress) खात्यात गेल्या.

मायावती आणि ओवेसी यांना भारतरत्न – संजय राऊत

दुसरीकडे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपच्या विजयासाठी मायावती आणि ओवेसी यांना टोला लगावला आहे. भाजपच्या विजयात मायावती आणि ओवेसी यांचा मोठा वाटा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या योगदानासाठी या दोन्ही नेत्यांना पद्मविभूषण आणि भारतरत्न द्यावे लागेल. शिवसेनेच्या पराभवावर संजय राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशातील काँग्रेस आणि शिवसेनेचा पराभव हा संवेदनशील राज्य असलेल्या पंजाबमधील भाजपच्या पराभवापेक्षा भीषण आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here