तक्रारदार महिलेकडून पोलीस अधिकाऱ्याने करून घेतली मसाज, Video

0

पाटणा,दि.29: Video: बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील नवहट्टा ब्लॉक अंतर्गत एका पोलीस ठाण्यात तक्रारदार महिलेकडून तेल मसाज करून घेतानाच एक पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ (Video) व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये इन्स्पेक्टर शशिभूषण सिंह फोनवर कोणाशी तरी बोलत आहेत, तर महिला त्यांना तेल मसाज करत आहे.

दरहर ओपीचे पोलीस स्टेशन अधिकारी शशी भूषण सिंग यांनी महिलेच्या असहायतेचा चुकीचा फायदा घेत बॉडी मसाज करून घेतल्याचा आरोप आहे. एसएचओच्या (station house officer) संभाषणावरून असे दिसते की महिला काही अडचणीत आहे आणि एसएचओ तिचे काम करून देण्याच्या बदल्यात तिच्याकडून ही सेवा घेत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्याचे एसपी लिपी सिंह यांनी एसएचओ शशिभूषण सिंह यांना निलंबित केले असून स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये पिवळी साडी घातलेली एक महिला मसाज करत आहे तर दुसरी महिला तिच्या समोर बसली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस चौकीच्या निवासी क्वार्टरमध्ये घटना घडल्याचे व व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आल्याचे दिसत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here