मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

0

मुंबई,दि.12: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी 8 जूनपासून आंदोलन सुरू केले आहे. आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे 288 उमेदवार उभे करणार. तसेच विधानसभेला आम्ही नाव घेऊन पाडणार असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, त्याबाबत सरकार गंभीर आहे. त्यांच्या मागण्यावर सरकार कारवाई करत आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मागच्या काळात आम्ही त्यांना जे आश्वासन दिलं होतं, त्याप्रमाणे केसेस परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही ते म्हणाले आहेत. त्यांची मागणी आहे त्याबाबतदेखील सरकारने पहिला नोटिफिकेशन जारी केलं असून त्यावर कार्यवाही सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले मी छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करणार आहे. “मी ओबीसी नेत्यांशी चर्चा करत आहे. छगन भुजबळ यांच्याशीदेखील चर्चा करून मी त्यांना समजावून सांगणार आहे. ज्यांच्याकडे कुणबी दाखला आहे त्यांना सर्टिफिकेट देता येतं. सर्वोच्च न्यायालयाने जे निकष ठरवून दिलेत त्यात बसणारं नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here