छगन भुजबळ यांचा मराठा समाजाने केला अनोख्या पध्दतीने निषेध

0

सोलापूर,दि.१८: छगन भुजबळ यांचा जुळे सोलापूर मराठा समाजाने सोलापुरातील गोविंदश्री चौकात अनोख्या पध्दतीने निषेध केला आहे. अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी अंबड येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना टीका केली होती. आमदारांना गावबंदी, खासदारांना गावबंदी! महाराष्ट्र काय तुमच्या सात बारावर लिहून दिलाय का? हे गावबंदीचे फलक ताबडतोब हटवले पाहिजेत. हे लोकशाहीचे राज्य आहे. असे अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

आज मराठा समाजाचा नेता निर्माण झाला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, धनगर, माळी, तेली हे मध्येच घुसले. त्यांना अभ्यास कळत नाही. आम्हाला आरक्षण घटनेने दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. मंडल आयोगाने दिले. नऊ न्यायमूर्तींनी त्यावर शिक्का मारला. आम्ही हक्काचे खातो, सासरच्या घरी तुकडे मोडत नाही, असे टीकास्त्र मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांचे नाव न घेता सोडले.

छगन भुजबळ यांचा जुळे सोलापुरातील मराठा समाज बांधवांनी निषेध केला. जुळे सोलापूर मराठा समाजाच्या वतीने आज (दि.१८) गोविंद श्री चौकामध्ये मराठा आरक्षणाला विरोध करणारे छगन भुजबळ यांना कैद्याच्या रूपात दाखवून झुणका भाकर खाऊ घालून निषेध आंदोलन करण्यात आले.

सोलापुरात छगन भुजबळांच्या विरोधात जुळे सोलापूर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात केलेल्या टीकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

एका मुलाला जेलमधील पोशाख घालून आणि छगन भुजबळ यांचा मुखवटा घालून प्रतिकात्मक छगन भुजबळ उभा करून त्यांच्या हातात बेड्या आणि एक ताट देऊन त्यामध्ये झुणका भाकरी देऊन छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

यावेळी शाम कदम, राजाभाऊ कुसेकर, चेतन चौधरी, मराठा उपोषणकर्ते प्रशांत देशमुख, सचिन गोडसे, सिताराम बाबर, शशिकांत शिंदे, प्रशांत बाबर, नामदेव पवार, मनीषा नलावडे, लक्ष्मी माने, मल्लू भंडारी, नागेश शिंदे, आधीसह जुळे सोलापुरातील मराठा समाज बांधव उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here