लोकसभा निवडणूक लढवणार का? मनोज जरांगे पाटील म्हणाले… 

0

जालना,दि.29: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले आहे. राज्यात उभं केलेलं हे मराठा आंदोलन जिरवायचं नसेल तर तुम्हाला निवडणुकीत उभं राहिल्याशिवाय पर्याय नाही. निवडणुकीत उभे राहिला नाहीत, तर इथला निजामी मराठा तुम्हाला कधी संपवेल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. गरिबांच्या चळवळी कधीच उभ्या राहू दिल्या नाहीत. आपण गरिबांच्या आणि उपेक्षितांच्या चळवळी उभ्या करत आहोत या चळवळीमध्ये एकजूट होणे महत्वाचे असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

भाजपा नेते आशिष देशमुख यांनी मनोज जरांगे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला होता. यावर मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आनंद आंबेडकर यांच्या भेटीवर भाष्य करताना, प्रकाश आंबेडकर यांचा शब्द डावलणं मला थोडं जड जातं. पण, माझं त्यांना आदरपूर्वक म्हणणं आहे. माझा सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळे, सगळा फोकस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळावं, याकडे आहे. माझा राजकीय मार्ग नाही, माझा सामाजिक मार्ग आहे. मी हा लढा समाजासाठी उभा केलेला आहे, असे म्हणत राजकीय भूमिका घेणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. 

समाज माझा मालक आहे. पण, राजकारण हा माझा मार्ग नाही, ज्वलंत मुद्दा माझ्यासमोर सध्या फक्त आरक्षणचा आहे. समाजाचा प्रश्न हाच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाच आहे. गोरगरीब मराठ्यांचे पोरं, कष्टकऱ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत, असे म्हणत राजकीय भूमिका घेणार नसल्याचंही जरांगे यांनी स्पष्ट केले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here