मुंबई,दि.14: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनसाठी फॉर्म्युला दिला आहे. राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सत्तेत असलेल्या महायुती सरकारने घोषणा आणि योजनांचा पाऊस पाडला आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीने निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच मराठा आंदोकल मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनसाठी MMD फॉर्म्युला दिला आहे.
मनोज जरांगे यांनी राज्यात सत्ता परिवर्तनसाठी ‘MMD फॉर्म्युला’ दिला आहे. ‘मराठा,मुस्लिम,दलित एकत्र आल्यास सत्तापरिवर्तन होईल असं जरांगे यांनी म्हंटले आहे. हाच मनोज जरांगे यांचा MMD फॉर्म्युला आहे. येवल्यांमध्ये मनोज जरांगे यांनी हा MMD फॉर्म्युला दिला आहे. ओबीसी,अठरापगड जातींनीही एकत्र यावं असं आवाहन देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे.
मराठा समाजाचा प्रश्न न सोडवल्यास राज्यात उलथापालथ केल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा जरांगेंनी दसरा मेळाव्यात दिलाय. दस-याला इशारा दिल्यानंतर जरांगे यांनी आता सामाजिक अभिसरणाचा प्रयोग राबवत आहेत. सत्ता बदल करण्यासाठी मराठा,मुस्लिम आणि दलित आणि अठरापगड जातींनी एकत्रित येण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय.