मनोज जरांगे यांनी सांगितले विधानसभा निवडणुकीत किती आमदार पडणार

0

जालना,दि.9: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत किती आमदार पडणार हे सांगितले आहे. मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला. समाजातील अनेकांनी अपक्ष दाखल केलेले अर्ज मागे घेतले. यानंतर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे आग्रही आहेत. आपल्याला राजकारणाचे काही देणे घेणे नाही, फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आग्रही असल्याचे सांगितले. 

मात्र सक्रीय राजकारणात जरी त्यांनी सहभागी न होण्याची भूमिका घेतली असली तरीही उमेदवार पाडणार असल्याची भूमिका घेतली आहे. मराठा समाज शंभर टक्के आरक्षण देऊन मोकळा करायचा आहे. निवडणुकीत मोठा होण्यासाठी रडारड करणारे खूप आहेत, त्यांनी ही रडारड समाजाच्या आरक्षणासाठी करावी, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका भाजपाला बसलेला आहे. आता विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर चालणार का, कुठे चालणार, किती प्रभाव असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. परंतु, ऐनवेळी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. परंतु, पाडापाडी होणार हे आवर्जून स्पष्ट केले. यानंतर आता मनोज जरांगे यांनी किती जणांना पाडणार याचा थेट आकडाच सांगितला आहे. 

सांगितले कितीजण पडणार

आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहेत आणि सहा कोटी मराठ्यांना खेटणे सोपे नाही, असा निर्धार मनोज जरांगेंनी बोलून दाखवला. उमेदवार पाडण्याच्या यादीत ११३ जण आहेत. ज्यांनी मराठा समाजास त्रास दिला, ज्यांनी मराठा समाजाच्या मुलांकडे पहिले नाही, त्यांना मराठे पाडू शकतात. आपण भाजपचे नाव घेतले नाही. आपण फक्त 113 पडणार आहे, असे म्हणालो आहे. मी समाजाला सरळ सांगितले आहे, कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडून आणा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here