जालना,दि.13: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले आंदोलन स्थगित केले आहे. मंत्री शंभूराजे देसाई यांच्या मागणीला विनंती देऊन त्यांनी हा निर्णय घेतलाय. आम्हाला आमच्या हक्काचे ओबीसीतील आरक्षण द्यावे. आमच्या मागण्यांसाठी आजपासून सरकारला एक महिन्यांचा वेळ देतो. परंतु, मागण्या मान्य न झाल्यास आपण निवडणुकीत उतरणार आणि नावे घेवून उमेदवार पाडणार असा इशारा देत जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले. जरांगे पाटील यांनी मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाला एक महिन्याचा वेळीही दिला आहे.
मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमधलं आपलं उपोषण अखेर स्थगित केलं आहे. मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, जरांगेंनी सरकारला 1 महिन्याचा अवधी दिला आहे. राज्य सरकारतर्फे शंभूराज देसाईंची विनंती जरांगेंकडून मान्य करण्यात आली. मागणी पूर्ण करण्यासाठी देसाईंनी राज्य सरकारच्या वतीने 1 महिन्याचा अवधी मागून घेतला.1 महिन्यात सकारात्मक निर्णय घेणार आहे.
आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, सापडलेल्या 57 लाख नोंदींचा आधार घेत मराठा आणि कुणबी एकच आहेत असा कायदा पारित करावा, हैदराबादचे गॅझेट लागू करावे, सातारा संस्थानचे गॅझेट लागू करावे, अंतरवालीसह राज्यातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीला रद्द न करता वारंवार कुणबी नोंदी शोधण्यास सूचित करावे. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना तातडीने प्रमाणपत्र वाटप करावेत यासह इतर मागण्या जरांगे पाटील यांनी शंभूराज देसाई यांच्याकडे केल्या.
मागण्या मान्य नाही झाल्या तर आपण राजकारणात उतरणार, नावे घेवून उमेदवार पाडणार, प्रसंगी काही ठिकाणी उमेदवार देणार नाही परंतु, पण नावे घेवून पाडणार, असा इशारा जरांगे यांनी दिला. देसाई यांनी जरांगे यांच्या मागण्यांबाबत एक महिन्यांचा वेळ शासनाला मागितला होता. त्यानुसार जरांगे यांनी एक महिन्यांचा वेळ देत उपोषण स्थगित केले.