मनोहरमामा भोसले यांना सात दिवसांची पोलीस कोठडी

0

दुष्कर्मप्रकरणी करमाळ्यात दाखल होता गुन्हा

करमाळा,दि.२१ : दुष्कर्मप्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा नोंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील उंदरगाव येथील आश्रमातील मनोहरमामा भोसले यांना करमाळा न्यायालयाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बारामती पोलिसांच्या ताब्यातून भोसले हे रविवारी करमाळा पोलिसांच्या ताब्यात मिळाले. त्यानंतर सोमवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने भोसले यांना सात दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली.

मनोहरमामा भोसले यांच्याविरुध्द करमाळा पोलीस ठाण्यात महिलेवर दुष्कर्म केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर जादूटोणा व फसवणूक प्रकरणी बारामती पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने बारामती व करमाळा पोलीस संशयित भोसलेंच्या मागावर होते.

पुणे पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील सालपे (ता.लोणंद) येथून भोसलेस अटक केली होती. त्यानंतर भोसले बारामती पोलिसांच्या ताब्यात होते. करमाळा येथील गुन्ह्यातील तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी भोसलेंच्या तपासासाठीची केलेली मागणी बारामती न्यायालयाने मंजूर केल्यावर करमाळा पोलिसांनी भोसलेस ताब्यात घेतले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here