सोलापूर,दि.7: महात्मा बसेश्वर महाराज स्मारक समितीची बैठक सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी शासकीय विश्रामगृह सात रस्ता, सोलापूर येथे संपन्न झाली. या बैठकीच्या सुरुवात महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे होते.
या बैठकीमध्ये बाराव्या शतकातील आद्य समाज सुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक बसवेश्वर सर्कल कोंतम चौक येथे बसवकालीन शरण व शरणी यांच्या भिंतीशिल्पासह व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.
सोलापुरातील महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडून एक कोटीचा निधी आणणार असल्याचे मनीष काळजे यांनी सांगितले.
व त्याचबरोबर अक्षतृतीया म्हणजेच महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंती 22 एप्रिल रोजी होणार असून सोलापूर शहरांमध्ये मोठ्या उत्साहामध्ये बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्सव साजरा केला जाते. त्या अनुषंगाने 22 एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरामध्ये सूट मिळण्याकरिता शासन दरबारी प्रयत्न करणे. या दोन्ही विषयांचा पाठपुरावा करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.
महात्मा बसवेश्वर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी मनीष काळजे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ नेते राजशेखर शिवदारे, विश्वनाथ चाकोते, सुधीर खराटमल, जगदीश पाटील, महादेव कोगनुरे, रेवणसिद्ध आवजे, बसवराज सावळगी, बसवराज बगले, गणेश चिंचोली, आनंद मुस्तारे, सचिन शिवशक्ती, शिवराज झुंजे, मल्लिनाथ सोलापूरे आदि समाज बांधव व बसवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समितीचे अध्यक्ष मनीष काळजे व सदस्य म्हणून योगेश जम्मा, गौरव जक्कापुरे, आकाश हारकुड, ईश्वर हिरेमठ, किरण तोळनुर, महेश जेऊर, राजशेखर बिराजदार-पाटील, आदित्य पुरवंत, सुमित शिंगारे ,आकाश मकाई, अशितोष वाले आदित्य म्हमाणे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव, बसवभक्त उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन आकाश हारकुड यांनी केले. तर प्रास्ताविक गौरव जक्कापुरे यांनी केले तर आभारप्रदर्शन महेश जेऊर यांनी केले.