मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहिर

0

मंगळवेढा,दि.6: मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहिर झाला आहे. मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी आज सोमवारी मतमोजणी शासकिय गोडाऊन येथे पार पडली. विजयानंतर सदस्यांनी आपापल्या गटाच्या नेत्याकडे धाव घेवून गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. परिणामी मंगळवेढा शहरातील रस्ते चक्क गुलालमय बनले होते.

बबनराव आवताडे गट -15, स्व.भालके गट -7, परिचारक गट -21, विदयमान आमदार आवताडे गट-13, अ‍ॅड. बिरूदेव घोगरे स्वतंत्र गट-1, अभिजीत पाटील गट-11 आदी गटाच्या नेतेमंडळींनी आमच्या ग्रामपंचायती निवडून आल्याचा दावा केला आहे.

गावनिहाय निवडून आलेले सरपंच व मते

लक्ष्मी दहिवडी-अनिल पाटील- 2033, मानेवाडी -शिवाजी मेटकरी -799, जुनोनी -दत्तात्रय माने-500, खुपसंगी-अनुराधा पडवळे-1309, आंधळगांव-लव्हाजी लेंडवे-1880, डिकसळ-सरुबाई लांडगे-279, पडोळकरवाडी-सुनिता पडोळकर-834, नंदूर-सुमन गोडसे-1217, अकोले-सुलोचना इंगळे-724, शिरशी-बाबासाहेब कसबे-692, निंबोणी-बिरूदेव घोगरे-1748, देगांव-बालिका ढेकळे-379, बठाण-पुजा कोडगर-1056, शेलेवाडी-सुनिता माळी -477, उचेठाण-भाग्यश्री कोळी-498, ब्रम्हपुरी-स्नेहलता पाटील -बिनविरोध, खडकी-संजयसिंग रजपूत-733, लोणार-मांतेश बिराजदार-1071, मुंढेवाडी-अरूण जावळे-605, जंगलगी-आमसिध्द चौखंडे -595, रड्डे-सरस्वती थोरबोले-1212, भाळवणी-लक्ष्मण गायकवाड-874, रेवेवाडी -सुनिता रेवे-647, महमदाबाद हुन्नूर-छाया मिसकर-666, चिकलगी-ललिता ऐवळे-907, जालिहाळ- सिध्दनकेरी-कृष्णाबाई चौगुले -932, हिवरगांव-कमल खांडेकर-बिनविरोध आदी सरपंचपदी निवड झाली आहे.

दरम्यान,27 ग्रामपंचायतीमध्ये 16 महिला सरपंचपदी निवड झाली आहे.आरक्षणामुळे महिलांना राजकिय काम करण्याची संधी उपलब्ध झाल्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळी 8.30 वा.शासकिय गोडाऊनमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला.यावेळी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार मदन जाधव, नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे, संदिप घाडगे यांचेसह महसूल विभागातील कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत मतमोजणी पार पडली. डी.वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार न घडता मतमोजणी शांततामय वातावरणात पार पडली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here