मेनका आणि वरुण गांधी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढले

0

लखीमपूर खेरी प्रकरणी केले होते ट्विट

दि.8 : वरुण गांधी (Varun Gandhi) आणि त्यांची आई मेनका गांधी (Maneka Gandhi) यांना भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढून टाकण्यात आले आहे. कदाचित यूपीच्या लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात वरूण गांधींच्या सततच्या ट्विटनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भाजप खासदार वरुण गांधी यांनी लखीमपूर घटनेबाबत वारंवार ट्विट केले होते आणि शेतकऱ्यांना लक्ष्य केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र, असे बदल ‘नियमित प्रक्रिया’ असल्याचे पक्षीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाचे खासदार वरूण गांधी यांनी ही लखीमपुर खेरीमध्ये झालेल्या हत्तेच्या संदर्भातील व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ अधिक धक्कादायक आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले. काही आंदोलक शेतकऱ्यांना तुडवून काळी एसयूव्ही निघाली तेव्हा हिंसाचार झाला. व्हिडिओ ट्वीट करताना वरुण गांधी यांनी गुरुवारी लिहिले की, निष्पाप शेतकऱ्यांचे रक्त सांडणाऱ्यांना न्याय द्यावा लागेल.

भारतीय जनता पक्षाने गुरुवारी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपली नवीन 80 सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये वाराणसीचे खासदार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते डॉ मुरली मनोहर जोशी यांच्यासह महाराष्ट्रातील बऱ्याच नेत्यांचा समावेश आहे.

भाजपची 80 जणांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर यांचा पुन्हा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here