CoronaVirus: वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मास्कसक्ती

0

मुंबई,दि.४: देशभरातील कोरोना (CoronaVirus) रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ६७ झाली आहे. देशात दररोज तीन हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. दिल्ली व एनसीआरमध्ये दिवसाला ५०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत.

वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर… | CoronaVirus

हरियाणाने १०० हून अधिक लोकसंख्या असलेल्या भागात मास्क सक्ती केली आहे. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात देखील सरकारी कार्यालये, कॉलेज आणि बँकांत मास्क सक्ती करण्यात आली आहे. तिकडे तामिळनाडू सरकारनेही मास्कसक्ती केली आहे. 

पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरु

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून कंपन्यांनी पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरु केले आहे. टेम्परेटर चेक केले जात आहे. मास्क सक्ती देखील करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आपल्याला सतर्क रहावे लागेल, परंतू घाबरण्याचे कारण नाही असे सांगितले आहे. 

दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीला मागणी संपल्याने तारीख उलटून गेलेले करोडो डोस फेकून देणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. कोविन पोर्टलवर कोवोवॅक्सला अपडेट करावे असे म्हटले आहे. १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना ‘हेट्रोलोगस’ बूस्टर डोस देता येईल असे म्हटले आहे. 

म्हणजेच आधी दोन डोस वेगळ्या कंपनीचे असतील तर तिसरा डोस दुसऱ्या कंपनीचा घेता येऊ शकेल असे म्हटले आहे. DGCI ने देखील १६ जानेवारीला कोवोवॅक्सला ‘हेट्रोलोगस’ बूस्टर डोस म्हणून देण्यास मंजुरी दिली होती. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन डोस घेतलेल्या लोकांना हा डोस देता येणार आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here