मल्लिकार्जुन खरगे यांची मोठी घोषणा, आमचे सरकार सत्तेत आल्यावर आम्ही गरीबांना…

0

लखनऊ,दि.15: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठी घोषणा केली आहे. इंडिया आघाडीची पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केली. लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. निवडणुकीचे चार टप्पे झाले आहेत. सोमवारी 20 तारखेला पाचव्या टप्प्याचं मतदान होणार आहे. या मतदानापूर्वी काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारची गच्छंती निश्चित आहे. 4 जूनला ‘इंडिया’ आघाडीचे सरकार सत्तेत येणार, असा विश्वास ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?

आमचे सरकार सत्तेत आल्यावर आम्ही गरीबांना 5 किलो नव्हे तर 10 किलो रेशन देऊ, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. 400 पारचा दावा भाजप करत आहे. पण भाजपला निवडणुकीत 140 जागाही जिंकता येणार नाही, असा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला. लखनऊमध्ये ‘इंडिया’ आघाडीची पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीचे 4 टप्पे झाले आहेत. निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडी पुढे असून भाजप पिछाडीवर आहे. पंतप्रधान मोदींची घरवापसी होणार हे जनतेने ठरवले आहे. 4 जूनला ‘इंडिया’ आघाडीचे केंद्रात सरकार येईल. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, असे मल्लिकार्जून खरगे म्हणाले.

2024 ची निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्याची आहे. एका बाजूला गरीबांसाठी लढणारे पक्ष आहेत. तर दुसऱ्या बाजूला श्रीमंतांचा साथ देणारे पक्ष आहेत. ‘इंडिया’ आघाडी गरीबांसाठी निवडणूक लढत आहे. मोदी सरकार 5 किलो रेशन देत आहे. मात्र केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महिन्याला 10 किलो रेशन देऊ, असे मोठे आश्वासन खरगे यांनी दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here