Malegaon News: माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार

0

मालेगाव,दि.27: Malegaon News: मालेगावमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. अज्ञात व्यक्तींना अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळ्या झाडल्या. मोटरसायकलवरुन आलेल्या या अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर एकूण तीन गोळ्या झाडल्या. अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

Malegaon News: माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार

अब्दुल मलिक युनूस इसा हे एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबलेले असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे. रात्री 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान ही गोळीबाराची घटना घटली. घटनेची माहिती मिळताच मलिक यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Malegaon News माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार

अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर झाडण्यात आलेल्या तिन्ही गोळ्या त्यांना लागल्या. एक गोळी हाताला, एक पायाला तर एक छातीत लागल्याची माहिती समोर येत आहे. अब्दुल मलिक युनूस ईसा यांना तातडीने उपचारासाठी नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी रुग्णालयात जाऊन अब्दुल मलिक युनूस ईसा यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आरोपींना तात्काळ अटक केली जावी अशी मागणी केली आहे. मालेगावमध्ये गुंडाराज सुरु असून आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही अशी टीका इस्माईल यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here