दि.1: Mahesh Manjrekar: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) मोठ्या कायदेशीर वादात अडकले आहेत. मराठी चित्रपटातील काही आक्षेपार्ह दृश्यांमध्ये लहान मुलांचा वापर केल्याप्रकरणी महेश मांजरेकरविरुद्ध मुंबई न्यायालयात POCSO (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने माहीम पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले होते.
महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा दिला आहे. मुंबईपोलिसांना पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांच्या तपासांत पोलीसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचं मांजरेकरांनी मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही दिली आहे.
कोर्टाच्या आदेशानंतर माहिम पोलीस स्थानकांत मांजरेकरांसह सिनेमाच्या निर्मात्यांवर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबई पोलीसांनी कारवाई केली आहे. दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशावरून मांजरेकर यांच्यावर माहिम पोलिसांनी गुन्हा नोंदविला. मांजरेकर यांच्यावतीने ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी न्या. एस.एस. शिंदे व न्या. एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे युक्तिवाद केला होता. ट्रेलरमध्ये दाखवलेली दृश्ये चित्रपटाचा भाग नाहीत व युट्यूबवरून ट्रेलरही हटवली आहेत,’ असे गुप्ते यांनी सांगितले होते.