Mahesh Manjrekar: दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

0

दि.24: Mahesh Manjrekar: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) मोठ्या कायदेशीर वादात अडकले आहेत. मराठी चित्रपटातील काही आक्षेपार्ह दृश्यांमध्ये लहान मुलांचा वापर केल्याप्रकरणी महेश मांजरेकरविरुद्ध मुंबई न्यायालयात POCSO (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने माहीम पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

एएनआयच्या वृत्तानुसार, महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध कलम 292, 34, पॉक्सो कायद्याच्या कलम 14 आणि आयटी कायद्याच्या कलम 67 आणि 67बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरन-भात लोन्चा’ (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) हा मराठी चित्रपट 14 जानेवारीला प्रदर्शित झाला. चित्रपटातील काही दृश्यांवरून बराच गदारोळ झाला होता आणि त्याविरोधात मुंबईच्या कोर्टात तक्रारी आणि याचिका दाखल झाल्या होत्या.



काय आहे प्रकरण

भारतीय स्त्री शक्ती या मुंबईस्थित स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा सीमा देशपांडे यांनी तक्रार दाखल केली असून, चित्रपटात अल्पवयीन मुलांचे त्यांच्या आंटीसोबत लैंगिक संबंध असल्याचे चित्रण करण्यात आले आहे. लहान मुलांसोबत हिंसाचाराची दृश्येही आहेत. चित्रपटातील संवाद अश्लील असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला होता. एनजीओने एफआयआर नोंदवण्यासाठी माहीम पोलिस आणि सायबर सेलकडे तक्रार केली होती. परंतु, काहीही कारवाई होत नसल्याने देशपांडे यांनी पॉक्सो न्यायालयात याचिका दाखल केली.

याशिवाय क्षत्रिय मराठा सेवा संस्थेच्या वतीने बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयात भारतीय दंड संहितेच्या कलम 292, 295 आणि 34 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदार वकील डीव्ही सरोज यांनी दावा केला होता की चित्रपटातील कंटेंटमुळे समाजात वैमनस्य निर्माण होऊ शकते. दुसरी तक्रार पॉक्सो अंतर्गत सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली. यामध्ये महेश आणि निर्मात्यांविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here