महेंद्रसिंग धोनी IPL च्या अंतिम फेरीत करणार अनोखा विक्रम

0

दि.14: महेंद्रसिंग धोनीची गणना जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 3 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. तरीही माही थांबला नाही, त्याने आता आयपीएलमध्येही आपले कर्णधारपद सिद्ध केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. तरीही माही थांबला नाही, त्याने आता आयपीएलमध्येही आपले कर्णधारपद सिद्ध केले आहे आणि चेन्नईला तीन वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा चेन्नई 15 ऑक्टोबरला आयपीएलचा अंतिम सामना 9 व्या वेळा खेळणार आहे. या सामन्यात माही आयपीएलमधील सर्वात वयस्कर खेळाडू आणि कर्णधार होण्याचा विक्रमही करेल. यासह धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे.

महेंद्रसिंग धोनीने 40 वर्षे आणि 95 दिवसांच्या वयात क्वालीफायरमध्ये प्रवेश केलाय. उद्या म्हणजे शुक्रवारी, जेव्हा तो आयपीएल फायनल (IPL Final 2021) खेळायला येईल, तेव्हा त्याचे वय 40 वर्षे आणि 100 दिवस असेल. राहुल द्रविडने 40 वर्षे 133 दिवसांच्या वयात कर्णधार म्हणून आयपीएलचा सामना खेळण्याचा विक्रम 2013 मध्ये केला होता.

एमएस धोनी आयपीएलच्या 200 सामन्यांमध्ये कर्णधार होणारा पहिला खेळाडू ठरला आहे. यासोबतच एका फ्रँचायझीसाठी इतके दिवस राहण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. तो आयपीएलमधील सर्वात जास्त कप्तानी करणारा कर्णधार बनला आहे आणि या प्रकारात त्याच्या आसपास कोणीही नाही.

धोनीने 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली. एवढेच नाही तर यासह चेन्नई पाच वेळा उपविजेताही राहिला आहे. 2008 मध्ये तिने फायनल खेळली पण ती जिंकू शकली नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here