महात्मा बसवेश्वर स्मारक सहआरक्षण व विविध विषय तातडीने मार्गी लावणार: शरद पवार

0

पुणे,दि.6: महाराष्ट्रातील लिंगायत समाजातील समाज बांधवांच्या दाखल्यावर विविध नावाने उल्लेख असलेल्या हिंदू लिंगायतसह सर्व पोट जातीना ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी तातडीने शुद्धिपत्रक काढण्याचे व मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक उभारण्यासाठी तज्ञाचे समिती गठीत करण्याचे व लातूर येथील विमानतळास जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्यासंदर्भात तातडीने बैठका घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्याचे सूचना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज संबधित खात्याच्या मंत्र्यांना दिल्या.

यासंदर्भात पुणे येथे सोमवारी सकाळी राज्यातील विविध जिल्ह्यातील लिंगायत समाजाचे शिष्टमंडळ लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वाखाली खासदार शरद पवार यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्या संदर्भात निवेदन दिले. यावेळी एका महिन्यात या मागण्या बैठका घेऊन तातडीने निकालात काढण्याचे सूचना खासदार पवार यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना दिली.

यापूर्वी 2014 साली लिंगायत समाजास हिंदू वाणीस ओबीसी आरक्षण मिळाले असून दाखल्यावर हिंदू लिंगायत उल्लेख असलेले समाज बांधव या पासून वंचित आहेत व ही संख्या मोठी आहे. मंगळवेढा येथील जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक तज्ञाचे समिती गठीत करून काम सुरू करण्यात यावे. लातूर येथील विमानतळास महात्मा बसवेश्वर यांचे नाव देण्यात यावे. आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून 500 कोटीची निधीची तरतूद करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील रुकारी, माजी आमदार मनोहर पटवारी, कार्यध्यक्षा सरलाताई पाटील, उपाध्यक्ष राजाभाऊ मुंडे, मराठवाडा अध्यक्ष उदय चौंडे, राज्य संघटक गुरुनाथ बडूरे,
राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संजय शेटे, समितीचे महासचिव भगवान कोठावळे उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here