Maharashtra: महापालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढणार

Maharashtra Cabinet: शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

0

सोलापूर,दि.11: Maharashtra Cabinet: महापालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) घेतला आहे. महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने स्वीकृत नगरसेवक (नामनिर्देशित सदस्यांची) संख्या सुधारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. (Maharashtra Cabinet News)

दहा पालिका सदस्य… | Maharashtra Cabinet News

यानुसार मुंबई महानगरपालिका अधनियमाच्या कलम 5 (1) (ब) मध्ये दहा नामनिर्देशित सदस्य व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 5 (2)(ब) मध्ये दहा टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाहीत किंवा दहा पालिका सदस्य, यापैकी जे कमी असेल अशी सुधारणा करण्याचा तत्वत: निर्णय घेण्यात आला. तसेच, याबाबत महाधिवक्ता, महाराष्ट्र राज्य यांचे प्रथम अभिप्राय घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा Solapur: परस्पर जमीन बळकावल्याचे प्रकरण, माजी आमदार दिलीप माने यांच्या पत्नीच्या नावे 45 कोटी रुपयांचे कर्ज

सोलापूर महानगरपालिकेत आता… | Maharashtra News

शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे सोलापूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या आता डबल होणार आहे. यापूर्वी सोलापूर महापालिकेत पाच स्वीकृत सदस्य होते आता त्याची संख्या दहावर जाणार आहे. राज्य सरकारच्या नवीन निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्षांना याचा फायदा होणार आहे.

यापूर्वी इतकी होती स्वीकृत नगरसेवकांची संख्या | Maharashtra News Today

मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 मधील कलम 5 (1)(ब) व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 मधील कलम 5 (2)(ब) मध्ये नामनिर्देशित करावयाच्या पालिका सदस्यांचे प्रमाण निश्चित केले आहे. त्यानुसार सध्या महानगरपालिकांतील (स्वीकृत नगरसेवकांची संख्या) नामनिर्देशित करावयाच्या पालिका सदस्यांची संख्या पाच आहे. राज्यात शहरी प्रशासनास सहकार्य करण्यासाठी व अनुभवी, कार्यकुशल व नागरी प्रशासनाचे ज्ञान असलेल्या व शासनाने केलेल्या नियमानुसार विहित अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तींची निवड नामनिर्देशित सदस्य म्हणून केली जाते. अशाप्रकारे नियुक्त केलेल्या नामनिर्देशित सदस्यांच्या ज्ञानाचा वापर करून महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या उद्देशाने नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याची आवश्यकता विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here