Maharashtra SSC Result 2023: दहावीचा निकाल 93.83 टक्के, निकालात मुलींचीच बाजी

0

पुणे,दि.2: Maharashtra SSC Result 2023: दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. दहावीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. दहावी बोर्डाचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत दिली माहिती.

सर्वाधिक निकाल कोकण मंडळाचा 98.11 टक्के
तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 92.5 टक्के

बारावीच्या निकालाप्रमाणेच दहा वीच्याही निकालाचा टक्का यंदा घटला आहे. | Maharashtra SSC Result 2023

दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.

SMS च्या माध्यमातून असा पाहा निकाल

विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाइल फोनवरुन एक एसएमएस करायचा आहे.

त्या नंतर लगेचच त्यांना मोबाइलवर निकाल पहायला मिळेल.

यासाठी विद्यार्थ्यांनी MHSSC टाईप करुन स्पेस द्यायचा आहे.

यानंतर आपला Seat Number टाईप करायचा आहे.

यानंतर हा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.

तुम्ही हा एसएमएस पाठवताच अवघ्या काही क्षणात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पहायला मिळेल.

असा पाहा ऑनलाईन निकाल

उद्या दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल http://mahahsscboard.in आणि http://mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. SSC Result 10वी चा निकाल कसा पाहाल? अधिकृत वेबसाइट http://mahresult.nic.in वर लॉग इन करा.महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जा सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव टाकून लॉगिन करा आणि तुमचा 10वीचा निकाल तपासा. SSC Result 2023

विभागवार निकाल

कोकण : 98.11 टक्के
कोल्हापूर : 96.73 टक्के
पुणे : 95.64 टक्के
मुंबई : 93.66 टक्के
औरंगाबाद : 93.23 टक्के
अमरावती : 93.22 टक्के
लातूर : 92.67 टक्के
नाशिक : 92.22 टक्के
नागपूर : 92.05 टक्के

दहावीचा निकालाची वैशिष्ट्ये
* राज्याचा दहावीचा निकाल 93.83 टक्के
* पुनरपरिक्षार्थींचे उत्तीर्णतेचे प्रणाम 60.90 टक्के
* खाजगी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रणाम 74.25
* दिव्यांगाच्या उत्तीर्णतेचे प्रणाम 92.49 टक्के
* राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 98.11टक्के
* एकूण 25 विषयांचा निकाल 100 टक्क्यांपेक्षा जास्त.
* मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 3.82 टक्क्यांनी जास्त.
* राज्यातील 5,26210 विद्यार्थ्यी प्रथम श्रेणीत, 3,34,015 द्वितीय श्रेणीत तर 85218 उत्तीर्ण.
* 14 जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रिका शाळेत उपलब्ध होतील
* यावर्षी दहावीचा निकाल 93.83 , मागीलवर्षी तो 96.94 टक्के होता. याचा अर्थ मागील वर्षीपेक्षा 3.11 टक्क्यांनी निकाल घटला.
* 2020 मधील निकालाशी तुलना करता यावर्षीचा निकाल 1.47 टक्के.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here