Maharashtra SSC Result: आज दहावीचा निकाल, SMS च्या माध्यमातूनही निकाल पाहता येणार

0

मुंबई,दि.2: Maharashtra SSC Result: दहावीच्या निकालाची धाकधूक असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. दहावीच्या निकालासंदर्भात (SSC Result 2023) मोठी माहिती समोर आली आहे. आज म्हणजेच 2 जून रोजी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करणार आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra Board 10th Result) आज अखेर जाहीर होणार आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी यांच्यातील धाकधूक चांगलीच वाढली आहे. मात्र हा निकाल नक्की कसा बघायचा आणि कधी बघायचा याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. तसंच गेल्या काही वर्षांत बोर्डाची वेबसाईट अनेकदा डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल (ssc result 2023 in marathi) बघण्यात अडचणी आल्या होत्या. म्हणूनच आता बोर्डानं SMS च्या माध्यमातूनही निकाल बघण्याची सोय विद्यार्थ्यांसाठी केली आहे.

SMS च्या माध्यमातून असा पाहा निकाल | Maharashtra SSC Result

विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाइल फोनवरुन एक एसएमएस करायचा आहे.

त्या नंतर लगेचच त्यांना मोबाइलवर निकाल पहायला मिळेल.

यासाठी विद्यार्थ्यांनी MHSSC टाईप करुन स्पेस द्यायचा आहे.

यानंतर आपला Seat Number टाईप करायचा आहे.

यानंतर हा एसएमएस 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.

तुम्ही हा एसएमएस पाठवताच अवघ्या काही क्षणात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पहायला मिळेल.

असा पाहा ऑनलाईन निकाल

उद्या दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल http://mahahsscboard.in आणि http://mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. SSC Result 10वी चा निकाल कसा पाहाल? अधिकृत वेबसाइट http://mahresult.nic.in वर लॉग इन करा.महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जा सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव टाकून लॉगिन करा आणि तुमचा 10वीचा निकाल तपासा. SSC Result 2023


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here