Sanjay Raut: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुनावणीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचे सूचक विधान

Maharashtra Politics: राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सुनावणी

0

मुंबई,दि.9: Sanjay Raut On Maharashtra Political Crisis: शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष (Political Crisis) सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सूचक विधान केलं आहे. उद्या राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी माध्यमांंशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे. हे सरकार घटनेची मोडतोड करून सत्तेत आले. घटनाबाह्य सरकारवर घटनेचा हातोडा पडल्याशिवाय राहणार नाही. आमचा न्यायालयावर आणि घटनेवर विश्वास असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत? | Sanjay Raut On Maharashtra Political Crisis

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे, फडणवीस सरकावर जोरदार निशाणा साधला आहे. हे सरकार घटनेची मोडतो करून सत्तेत आले आहे. घटनाबाह्य सरकार एक दिवसही सत्तेत राहात कामा नये. कोर्टाकडे आम्ही मोठ्या अपेक्षेनं पहात आहोत. आमचा न्यायालयावर, घटनेवर विश्वास आहे. कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळेल. घटनेचा हातोडा घटनाबाह्य सरकारवर पडल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut On Maharashtra Political Crisis
संजय राऊत

राऊत यांची केंद्र सरकारवर टीका | Maharashtra Political News

दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. देशात काही नवं घडणार नाही. दिल्लीत महाराष्ट्राचा अपमान होत आहे. केंद्रात फेरबदल झाले तरी तेच पत्ते पिसणार, राज्यात सुडाचं राजकारण सुरू आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

उद्या राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी | Maharashtra Politics

दरम्यान उद्या राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. पाच ऐवजी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी मागील सुनावणीवेळी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्यामुळे उद्या होणाऱ्या सुनावणीमध्ये सत्तासंघर्षावर तोडगा निघणार की हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात येणार हे पहावं लागणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here