जळगाव,दि.२२: Sanjay Raut On Ajit Pawar: राज्यात सत्तांतर झाल्यापासून राजकीय वातावरण तापले आहे. अशात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चाही सुरू झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) 16 आमदार अपात्र झाल्यानंतर अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर स्वतः अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. मी कुठेही जाणार नाही राष्ट्रवादीतच राहणार असं अजित पवार यांनी सांगितलं होतं. अशातच अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठा दावा केला आहे. आगामी २०२४ च्या निवडणुकीनंतर काय, आता म्हटलं तरी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला १०० टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली आहे.
अजित पवारांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे | Sanjay Raut On Ajit Pawar
यावर आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “मुख्यमंत्री होण्यास कोणाला आवडणार नाही. अजित पवारांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते अनेक वर्षापासून राजकारणात असून, मंत्रीही होते. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं. अनेकजण जुगाड करून लायकी नसताना मुख्यमंत्री होतात,” असा टोला संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.
“अजित पवारांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा व्यक्त केली नाही. त्यामुळे अजित पवारांना माझ्या शुभेच्छा आहेत,” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
तर कदाचित दिवंगत आर. आर.पाटील मुख्यमंत्री झाले असते…
‘सकाळ’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अजित पवारांनी म्हटलं, “सन २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७१ तर काँग्रेसचे ६९ आमदार निवडून आले होते. त्यावेळी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी मिळेल अशी शक्यता होती. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनाही तसेच वाटत होते. पण, दिल्लीत काय घडले माहिती नाही. काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद दिले गेले. पण, त्यावेळी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आले असते तर कदाचित दिवंगत आर. आर.पाटील मुख्यमंत्री झाले असते.”
ठाकरे यांच्यासोबत आनंदाने, समाधानाने काम केले. पण, चव्हाण यांच्यासोबत…
“तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. या दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. ठाकरे यांच्यासोबत आनंदाने, समाधानाने काम केले. पण, चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने आणि वरिष्ठांनी सांगितल्यामुळे काम केलं,” असा खुलासा अजित पवारांनी केला आहे.