अकोला,दि.२१: Prakash Ambedkar On Uddhav Thackeray: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि पक्षचिन्ह देण्याचा निर्णय घेतला. हा ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? | Prakash Ambedkar On Uddhav Thackeray
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकारण पाहता, एप्रिलअखेरीस विधानसभेची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक झाली तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीपासून वंचित राहावे लागण्याचीही शक्यता आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.
आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडील पक्षाचे नाव व चिन्ह गेले असले तरी आमच्या युतीवर त्याचा परिणाम होणार नाही. मी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे. ही आमची वैयक्तिक युती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली युती ही २०२४ पर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी आहे.