Uddhav Thackeray: ‘शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे…’ उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray PC: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करु नये

0

मुंबई,दि.8: शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (Uddhav Thackeray PC) सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या संदर्भातील निकाल लवकर लागला पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करु नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

हेही वाचा Turkey Bird Viral Video: संकटाची चाहूल पशू-पक्षांना आधीच लागते? आनंद महिंद्रा यांनी शेअर केला Video

हे सांगण्याचा आमचा हेतू नाही मात्र… | Uddhav Thackeray

निवडणूक आयोगाने काय करावं आणि काय करु नये, हे सांगण्याचा आमचा हेतू नाही. मात्र आम्ही निवडणूक आयोगाला सूचित करत आहोत, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. निवडणूक आयोगाने आम्हाला जे काही करायला सांगितले, ते सर्वकाही आम्ही केलं आहे, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. 

अपात्रतेचा निर्णय आधी यावा | Uddhav Thackeray PC

“16 जण अपात्र ठरण्याची शक्यता दाट आहे. घटनातज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे त्याचा निर्णय आधी लागावा अशी आमची इच्छा आहे. आयोगानं जे काही मागितलं, ते सगळं आम्ही आयोगाला पुरवलं आहे. पण नंतर हे गद्दार गट सांगायला लागले की आमच्याकडे आमदार-खासदार जास्त आहे. एखाद्याला ओसरी राहायला दिली तर तो उद्या घरावर अधिकार सांगायला लागला असा तो प्रकार झाला”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे

“निवडून आलेल्या प्रतिनिधींवरच ठरवायचं असतं, आयोगाने एकतर्फी बाजू घेण्याचा निर्णय घेतला असता तर दोन-तीन महिन्यांपूर्वीच आयोग निकाल देऊ शकत होता. पण मधल्या काळात त्यांनी आम्हाला जो खटाटोप करायला लावला, तो आम्ही व्यवस्थित केला आहे. मधल्या काळात आमच्या शपथपत्रांवरही आक्षेप घेतला. मग तो आक्षेप का घेतला? जर तुम्हाला ती मानायचीच नव्हती, तर मग आक्षेप का घेतला? त्यांना आता कळलंय की यांचं पारडं जड आहे. दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

घटनेला काहीतरी अर्थ असतो…

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचे आमदार अपात्र होणारच असल्याचा ठाम दावा केला. “घटनेला काहीतरी अर्थ असतो. उगीच तो कागदपत्रांचा खेळ नसतो. त्यामुळे घटनेनुसार आयोगाने काही कायदे केले आहेत. त्यांचं पूर्ण पालन आम्ही करतो. त्याचवेळी कार्याध्यक्ष वगैरे पदं आम्ही घटनेनुसार निर्माण केली. आयोगाच्या मान्यतेनुसारच आम्ही कारभार करतो. आता त्यांची अडचण ही झालीये की त्यांनी व्हीप मोडला आहे. त्यामुळे ते अपात्र तर होणारच. अपात्र झाल्यानंतर पुन्हा दावा कसा सांगणार? त्यामुळे यात वेळ लागावा, विलंब व्हावा म्हणून ही खुसपटं काढायची आणि नको तो युक्तीवाद तिथे करायचा याला काही अर्थ नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटावर हल्लाबोल केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here