Uday Samant On Ajit Pawar: तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही राहू

0

मुंबई,दि.22: Uday Samant On Ajit Pawar: शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर (Ajit Pawar) वक्तव्य केलं आहे. अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. नंतर अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या सहयांचे पत्र असल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर अजित पवार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चाही रंगली. यावर स्वतः अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी पक्षात राहणार आहे असे पवार म्हणाले.

अजित पवार यांनी विचारधारा बदलली तर… | Uday Samant On Ajit Pawar

मात्र, यातच आता अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरून प्रतिक्रिया येत असून, शिंदे गटाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी विचारधारा बदलली तर स्वागत आहे, असेही शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. 

शिंदे गटातील नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजितदादांची विचारधारा जर बदलली, त्यांनी आमची विचारधारा जर स्वीकारली तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही राहू. परंतु, प्रश्न विचारधारेचा आहे, सांगत उदय सामंत यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत आल्यास काहीच अडचण नसल्याचे सूचित केले आहे. 

नरेंद्र मोदी यांचे अजित पवारांनी केले कौतुक

अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर उरलेल्या शिवसेनेने बोलले पाहिजे. काँग्रेसने बोललेले पाहिजे. शिवसेना ठाकरे गट सांगतात की, आमचा मुख्यमंत्री होणार, काँग्रेस सांगते आमचा मुख्यमंत्री होणार, यावरून आवळलेली वज्रमूठ एकत्र नाही हे सिद्ध होते. एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी सात वेळा नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे, असेही ते म्हणाले. तसेच अजित पवार हे विरोध पक्षनेते आहेत. त्यामुळे सरकार जाणार हे त्यांना सांगावच लागते. पुढील दीड वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील. आगामी काळात शिंदे -फडणवीस यांच्याच नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here