आमदार संजय शिरसाट यांचा शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबाबत मोठा दावा

Sanjay Shirsat: पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीवरून चर्चा सुरू आहेत

0

औरंगाबाद,दि.17: Sanjay Shirsat On Sanjay Raut: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांशी चर्चा केल्यानंतरच झाला होता असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीवरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

त्यात आता पूर्वाश्रमीचे शिवसेना आमदार जे सध्या शिंदे गटात आहेत त्या संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्याबद्दल गौप्यस्फोट केला आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत राऊतांनाही कल्पना होती असा दावा त्यांनी केला आहे. 

संजय राऊत हा साधासुधा माणूस नाही | आमदार संजय शिरसाट

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत हा साधासुधा माणूस नाही. हे सत्तांतर झाले ते सहजासहजी झाले नाही. संजय राऊत हा सायको आहेत. हा कधी काय बोलेल आणि कधी कुणाला अडचणीत आणेल हे सांगता येत नाही. उद्धव ठाकरेंना या सायकोपणामुळेच अडचणीत आणले. जेव्हा 2019 मध्ये सत्तांतर होणार होते. मातोश्रीवरील बैठक, एकनाथ शिंदे यांना दिलेल्या सूचना हे सर्वकाही सुरू असताना संजय राऊत पडद्यामागून वेगळ्या हालचाली करत होते. शरद पवार आणि संजय राऊतांचे घट्ट नाते आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही सगळे हॉटेलमध्ये असताना टीव्हीवर पाहिले शपथविधी सोहळा झाला. त्यानंतर ज्या घडामोडी घडल्यात त्यात एक ट्विस्ट आला. आता जर हे थांबवायचं असेल तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न करता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करावं लागेल हे ट्विस्ट झाले. गेमचेंजर त्याठिकाणी झाला. उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती तरी त्यांना मुख्यमंत्री व्हावे लागले असं त्यांनी सांगितले. 

…हे शरद पवारांना माहिती होते | MLA Sanjay Shirsat

त्याचसोबत सत्ता मिळवल्यानंतर उद्धव ठाकरेंना सत्ता राबवता येत नाही हे शरद पवारांना माहिती होते. संजय राऊत हा त्यातला प्यादा होता. संजय राऊतांना पहाटेचा शपथविधी माहिती होता. हे उद्धव ठाकरेंना कळाले होते. परंतु परिस्थितीने त्यांना काहीच करता येत नव्हते. पुन्हा भाजपाकडे जायचं नाही म्हणून त्यांनी हे पद स्वीकारले. काँग्रेस सक्रीय नव्हती. परंतु राष्ट्रवादी शिवसेनेला संपवेल हे आम्ही सांगितले होते. आज तेच झाले राष्ट्रवादीने स्वत:चं अस्तित्व मोठे केले आणि शिवसेनेचे नुकसान झाले असंही आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. 

अजित पवार बोलले तर राजकीय स्फोट घडेल

पहाटेच्या शपथ विधीची सर्व माहिती संजय राऊत यांना होती. त्यामुळे यावर आज संजय राऊत कोणतेही प्रतिक्रिया देत नाही. याबाबत जर अजित पवार बोलले तर बॉम्बस्फोट होईल. कारण अजित पवार हे फार स्पष्ट बोलणारे नेते आहे. त्यामुळे यावर त्यांनी वक्तव्य केल्यास राज्याच्या राजकारणात बॉम्बस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच पहाटेच्या शपथ विधीची सर्व माहिती संजय राऊत यांना असल्याचं उद्धव ठाकरे यांना कळाले होते. मात्र परिस्थिती अशी झाली होती की, दुर्दैवाने राष्ट्रवादीसोबत जावे लागले होते. पण पुढे राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न केले असल्याचं देखील संजय शिरसाट म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here