Maharashtra Politics | प्रकाश आंबेडकर यांचे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मोठं वक्तव्य

Maharashtra Politics | काँग्रेसने आम्हाला कायम चेपलं आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले

1

मुंबई,दि.13: Maharashtra Politics | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीनंतर मोठं वक्तव्य केलं आहे. (Maharashtra Politics) राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची चर्चा असतानाच आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयात प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली आहे.

Maharashtra Politics | काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

“कोण-कोणाला भेटलं की त्याला राजकारणाचा वास येतो असं नाही. आपापल्या वैयक्तिक भूमिका सर्वांच्या आहेत”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Maharashtra Politics

काँग्रेसने आम्हाला कायम चेपलं

“मी 40 वर्षांपासून राजकारणात आहे. काँग्रेसने आम्हाला कायम चेपलं, शिवसेना आता आमच्यासोबत येत आहे. काँग्रेसच्या सोबत कायम भांड्याला भांड लागलं”, असं आबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे आले होते एकत्र

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी एकाच मंचावर आले होते. त्यानंतर आगामी पालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी उद्धव ठाकरेंच्या गटासोबत युती करेल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. महत्वाची बाब म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये याबाबतची प्राथमिक चर्चा झाल्याचीही माहिती समोर आली होती.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणाले?

“शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी कोणासोबत जायचं ते त्यांनी ठरवावं, बॉल आता त्यांच्या कोर्टात आहे”, असंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट ही प्रत्येकवेळी राजकीय नसते. असं झालंच तर अनेक जणं घरी बसतील”, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी इंदू मिलबाबत चर्चा करण्यासाठी माझी भेट घेतली होती. या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे इन्स्टिट्यूशन सुरू करण्याची मागणी केली”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.


1 COMMENT

  1. Adarniy Prakash ji Ani adarniy Shinde ji Dr.Ambedkar smarka madhye fakt SC/ST sathi PHD centre kadha hi winti. Nikambe Sir.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here