पुणे,दि.२५: Maharashtra Politics News: माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी महाविकास आघाडी (MVA) आणि एकनाथ शिंदेंच्याबाबत (Eknath Shinde) गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे यांनी शिवसेनेवर व पक्षाच्या चिन्हावर दावा सांगितला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. हा सगळा घटनाक्रम उलटून जवळपास सहा महिने पूर्ण होत असताना आता शिंदे गटातील नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना खळबळजनक दावा केला आहे.
हेही वाचा Jayakumar Gore Accident: जयकुमार गोरे यांच्या अपघाताबद्दल रणजितसिंह निंबाळकर यांनी केला खुलासा
पहिल्या दोन महिन्यांनंतरच… | Maharashtra Politics News
‘महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांनंतरच मी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या नंदनवन या बंगल्यावर चार ते साडेचार तास भेटलो. यावेळी मी शिंदे यांना सांगितलं की, हे सरकार जनतेच्या हिताचं नाही, उद्धवजींकडून चूक होत आहे. तुम्ही त्यांना निर्णय बदलायला सांगा, असं म्हणत या उठावाचं बीज मीच शिंदे यांच्या डोक्यात पेरलं होतं,’ असा गौप्यस्फोट विजय शिवतारे यांनी केला आहे.
निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीची स्थापना | Maharashtra News
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना आणि भाजप युतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे गेले. मात्र निवडणूक निकालानंतर भाजप ठरल्याप्रमाणे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद विभागून घेत नसल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. मात्र महाविकास आघाडीचा निर्णय हा निवडणुकीनंतर नव्हे तर निवडणूक होण्याच्या आधीच झाला होता, असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीआधीच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत समझोता
‘उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीआधीच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत समझोता केला होता. कोणत्या जागा पाडायच्या, कोणत्या निवडून आणायच्या याची रणनीती ठरवण्यात आली होती,’ असा आरोपही शिवतारे यांनी केला आहे.
दरम्यान, विजय शिवतारे यांनी केलेल्या या गौप्यस्फोटावर आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने त्यांच्या गटातील नेत्यांकडून काही प्रतिक्रिया देण्यात येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.