Navneet Rana: नवनीत राणांच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरील वक्तव्यावरून अमोल मिटकरी यांची टीका

Navneet Rana News: नवनीत राणा यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण

0

मुंबई,दि.11: खासदार नवनीत राणांच्या (Navneet Rana) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरील वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी टीका केली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री असून महाराष्ट्राच विकास देवेंद्र फडणवीसच करू शकतात, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं आहे. नवनीत राणा यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलेय. राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. तर भाजपनं नवनीत राणा यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. (Navneet Rana News)

नवनीत राणा काय म्हणाल्या? | Navneet Rana News

देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत. या राज्याचा जर कुणी विकास करू शकतो तर तो फक्त देवेंद्र फडणवीस हेच आहेत. येणाऱ्या काळात अमरावती लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा फक्त बडनेरा सोडून भाजपचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. जिथे जिथे फडणवीस यांचे पाऊल पडले तिथं विकासच होणार..आणि आमच्यासाठी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, असे नवनीत राणा म्हणाल्या. बडनेरा इथून रवी राणा आमदार असल्याने ती जागा सोडून इतर ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले पाहिजे हे बोलताच सभेत एकच हश्या उडाला.

Navneet Rana News
नवनीत राणा

आमदार अमोल मिटकरींची टीका | Amol Mitkari

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) खासदार नवनीत राणांच्या देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री असल्याच्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी टीका केली. ते म्हणाले की, महाविकास आघाडी ही सातत्याने सांगते आहे की एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री असले तरी ते भाजपचे मुख्यमंत्री नाहीत. भाजपला न पचलेले मुख्यमंत्री आहेत. हे नवनीत राणा पहिल्यांदा बोलल्यात असं नाही. चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आज त्यावर नवनीत राणांनी कळस चढविला आहे. एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री असले तरी आपण देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री मानतो. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनीच देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं होतं. विधानानंतर नवनीत राणांचं विधान खरं सत्ताधारी कोण हे सांगणारं. या सरकारमध्ये धुसफूस आणि अंतर्विरोध आहे. एकनाथ शिंदेंना भाजपचा कोणताच नेता गांभिर्याने घेत नाही. शिंदेसोबत गेलेल्या 40 लोकांनीच भाजप कसं संपवतंय याचे हे सुचक विधान. हे 40 आमदार भाजपात सहभागी केल्याशिवाय शिंदेंकडे मार्ग नाही. ज्या दिवशी असं होईल त्या दिवशी यांचं अस्तित्व संपलेलं असेल. एकनाथ शिंदेंनी आता तरी जागं व्हावं. भाजपाची खेळी ओळखावी, असे अमोल मिटकरी म्हणाले.

बावनकुळेंची नवनीत राणांना ऑफर

नवनीत राणा यांनी राष्ट्रीय पक्षात यावं. त्या राष्ट्रीय पक्षात काम करण्यायोग्य आहेत. त्यांनी भाजप पक्ष स्वीकारावा ते पक्षात आले तर खऱ्या अर्थाने त्यांचा मानसन्मान केला जाईल. 2024 मध्ये आम्ही एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. बडनेरा मतदारसंघात खासदार आणि आमदार भाजपचे यावे, यासाठी आम्ही युवा स्वाभिमानला विनंती करणार आहोत. त्यांना ही विनंती करू की त्यांनी राष्ट्रीय पक्षात काम करावं. 2024 पर्यत त्यांचं मनपरिवर्तन होईल. कोण मुख्यमंत्री आणि कोण उपमुख्यमंत्री यापेक्षा महाराष्ट्रच्या जनेतला विकास महत्वाचा आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असे बावनकुळे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here