Nana Patole On MVA: महाविकास आघाडी लोकसभा जागा वाटपाबाबत नाना पटोले म्हणाले…

0

नागपूर,दि.2: Nana Patole On MVA: महाविकास आघाडी लोकसभा जागा वाटपाबाबत नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र जागा वाटपावरून मविआतील अतंर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून मात्र 18 जागांवर दावा करण्यात आला आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले नाना पटोले? | Nana Patole On MVA

आज आणि उद्या राज्यातील लोकसभेच्या 48 जागांचा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी राज्यातील सगळे माजी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या निमित्तानं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुका बूथ पातळीचा आढावा घेतला जाईल. निवडणूक कशा जिंकता येतील हे महत्त्वाचं आहे. आघाडीत जी जागा ज्या पक्षाला सुटेल त्याला मदत केली जाईल. भाजपचा पराभव करण हेच मविआचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावर मविआत कोणतीही बिघाडी होणार नसल्यांचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस त्याकडे लक्ष देत नाही, त्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. काँग्रेसची एक भूमिका आहे, राज्यात सध्या महागाई, बेरोजगारी या सारखे महत्त्वाचे प्रश्न आहेत असं पटोले यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here