Jitendra Awhad: ‘संभाजी महाराज, सुलतान अकबर मित्र होते, दोघांचेही वेगवेगळे धर्म होते पण…’ जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं

0

मुंबई,दि.६: राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) भाजपाच्या निदर्शनानंतर आक्रमक झाले आहेत. आव्हाड यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज तसेच अफजल खान आणि शाहिस्तेखानाविषयी केलेल्या विधानावर आक्षेप घेतला जात आहे. भाजपाकडून आव्हाड यांचा निषेध व्यक्त केला जात असून काही ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनदेखील केले आहे. आपल्या विधानामुळे वाद निर्माण झाल्यामुळे आव्हाड यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे.

आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास… | Jitendra Awhad

मात्र तरीदेखील भाजपाकडून आव्हाडांवर आक्रमकपणे टीका केली जात आहे. यावरच आता आव्हाडदेखील आक्रमक झाले आहेत. मी केलेल्या विधानानंवर सारवासारव करत नाही. मी याआधीही कधी तसे केलेले नाही. मी फार विचार करूनच बोलतो. अंदमान, निकोबर तसेच तुरुंग काढून टाका आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास समजावून सांगा, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

संभाजी महाराज, सुलतान अकबर मित्र होते… | Maharashtra Politics

“शिवाजी महाराजांनी लाखाचे सैन्य घेऊन आलेल्या अफजलखानाला पाच जणांना सोबत घेऊन मारून टाकले. म्हणूनच त्याला अर्थ आहे. त्यांना शिवाजी महाराजांची महानता लोकांना समजू द्यायची नाही. त्यांना संभाजी महाराज एका धर्मात बंद करून ठेवायचे होते. औरंगजेबाचा बंडखोर पुत्र औरंगजेबाशी भांडला होता. तसेच दिल्लीची सल्तनत संभाजी महाराजांना आपण दोघे ताब्यात घेऊया असे सांगतो. मात्र काही गद्दार सुलतान अकबराचे डोके फिरवू पाहतात. आपण संभाजी महाराजांना ठार करू आणि राज्यकारभार ताब्यात घेऊ असे अकबराला सांगतात. हीच बाब सुलतान अकबर संभाजी महाराजांना सागतो. त्यानंतर संभाजी महाराज त्या पाच जणांना हत्तीच्या पायाशी देतात. हा इतिहास त्यांना सांगू द्यायचा नाही. संभाजी महाराज, सुलतान अकबर मित्र होते. दोघांचेही वेगवेगळे धर्म होते. पण दिल्लीची सल्तनत ताब्यात घेण्याचा त्यांचा उद्देश एकच होता. हे संदर्भ द्यावे लागतात. त्याशिवाय इतिहास सांगता येत नाही,” असेही आव्हाड म्हणाले.

आणि सावरकरांचे महत्त्व पटवून दाखवा

“मी कधीही सारवासारव करत नाही. मी माझ्या आयुष्यात तसे कधीही केलेले नाही. मी जे बोलतो ते विचार करून बोलतो. मी विचार साफ करून बोललेलो आहे. ऐतिहासिक संदर्भ तुम्हाला वजा करता येत नाही. एक साधं उदाहरण देतो, उद्या अंदमान निकोबर आणि तुरुंग काढून टाका आणि सावरकरांचे महत्त्व पटवून दाखवा. त्यांचे महत्त्व समजावून सांगा. हिटलर होता म्हणून स्टालिन, चर्चिल, रुझवेल्ट एकत्र आले ना. हिटलरच नसता तर ते तिघे एकत्र आलेच नसते. हिटलर, मुसलोनी होता म्हणूनच दुसरे महायुद्ध झाले ना. हल्दी घाटीच्या लढाईचे उदाहरण द्या. अकबर विरुद्ध महाराणा प्रतापसिंह ही लढाई घ्या. यामध्ये अकबराला काढून टाका. मग महाराणा प्रतापसिंह यांच्यात शौर्य होते, हे कसे सांगणार तुम्ही. समोर अकबर आहे म्हणूनच सांगणे शक्य आहे,” असे आव्हाड यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here