Maharashtra Politics: भाजपा पदाधिकाऱ्याची जितेंद्र आव्हाडांबाबत वादग्रस्त घोषणा

Maharashtra Politics: जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलं होतं वक्तव्य

0

जालना,दि.6: Maharashtra Politics: भाजपा पदाधिकाऱ्यानी जितेंद्र आव्हाडांबाबत (Jitendra Awhad) वादग्रस्त घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. अफजलखान आणि शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत, असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं. त्याविरोधात भाजपाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. अशातच जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षीसाची वादग्रस्त घोषणा करण्यात आली आहे.

जितेंद्र आव्हाड दिसतील, तिथे त्यांची… | Maharashtra Politics

जालन्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा ओबीसी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी म्हटलं की, “महाराष्ट्रातील जनतेला आवाहन आहे की, जितेंद्र आव्हाड दिसतील, तिथे त्यांची जीभ छाटावी. जो जीभ छाटेल 10 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल,” अशी घोषणा कपिल दहेकर यांनी केली.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते? | Jitendra Awhad

महाराष्ट्र सन्मान परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडेंनी विधानसभेत सांगितलं की, आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हटलं की, मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे.”

“1669 साली दुष्काळ होता. तेव्हा आपल्या तिजोरीचे टाळे उघडून शेतकऱ्यांमध्ये पैसे जाऊद्या, हे सांगणारे जगातील पहिले राजे शिवाजी महाराज होते,” असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.

भाजपा युवा मोर्चाने जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. पण, पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना रोखत ताब्यात घेतलं. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर भाजपाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

जितेंद्र आव्हाड यांनी दिलं स्पष्टीकरण

भाजपाने ठिकठिकाणी निदर्शने करत आव्हाड यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला. मात्र आव्हाड त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका तसेच त्यांनी केलेले विधान यावर सविस्तर भाष्य केले आहे. मी एका अराजकीय मंचावर बोललो होतो. त्यामुळे राष्ट्रवादी माझ्या वक्तव्याला पाठिंबा देण्याचा प्रश्न नाही, असे आव्हाड म्हणाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here