Ajit Pawar | ‘माफी मागण्याइतका मी काय गुन्हा केलाय किंवा…’: अजित पवार

0

मुंबई,दि.6: Ajit Pawar On Devendra Fadnavis: राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. राज्यात सध्या महापुरुषांविषयी केल्या जाणाऱ्या विधानांवरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सत्ताधारी पक्षाकडून विधानं केली जात असताना दुसरीकडे औरंगजेब, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विरोधी पक्षाकडून केल्या गेलेल्या काही विधानांवरून राजकारण सुरू झालं आहे. (Ajit Pawar News)

अजित पवारांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याचेही अशाच प्रकारे राज्यातील राजकारणात पडसाद उमटू लागले आहेत. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी बोलताना केलेल्या वक्तव्यावर आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा Solapur ST Bus Accident: सोलापूर जिल्ह्यात एसटी बसचा अपघात; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण

Ajit Pawar On Devendra Fadnavis
अजित पवार

आपल्या विधानावर ठाम | Ajit Pawar News

पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा वाद अद्यापही शमताना दिसत नाही. यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले आहे. यानंतर पुन्हा एकदा पत्रकारांशी बोलताना, पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. तुम्हाला द्रोह वाटत असेल, तर करा केस दाखल, या शब्दांत अजित पवारांनी पलटवार केला आहे. 

हेही वाचा शिंदे गटाचा महाविकास आघाडी ठाकरे गटाला मोठा धक्का

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? | Maharashtra Politics

“छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणण्यास कोणाचीच हरकत नाही. ते स्वराज्य रक्षक आहेतच. छत्रपती संभाजी महाराज हे देव, देश आणि धर्मासाठी लढले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर महाराष्ट्रात हिंदू उरलेच नसते. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच. त्यांना धर्मवीर न म्हणणं हा द्रोह आहे”, असं देवेंद्र फडणवीस गुरुवारी म्हणाले होते.

अजित पवारांचं प्रत्युत्तर | Ajit Pawar On Devendra Fadnavis

फडणवीसांच्या या वक्तव्यावर पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त करत टीका केली होती. याबाबत अजित पवार यांना पत्रकारांकडून विचारणा करण्यात आली. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मला पुन्हा पुन्हा हे विषय वाढवायचे नाहीत. मला माझे काम करत राहायचे आहे. आम्ही आमच्या कामाला आणि लोकांच्या प्रश्नाला महत्त्व देतो. त्यांनी काय म्हणावे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे ना. तुम्हाला जर द्रोह वाटत असेल, तर त्यात केस दाखल करा. ही केस नियमात बसते का? आम्ही जिवात जीव असेपर्यंत छत्रपतींच्या विचारांशी आमच्याकडून कधीही द्रोह होणार नाही. आमच्या पुढच्या 10 पिढ्यांमध्येही तसा द्रोह होणार नाही. उगीच त्यांनी काहीतरी बोलायचे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

माफी मागण्याइतका मी काय गुन्हा केलाय?

प्रत्येकाला आपापली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. राज्यघटनेचे पालन सगळ्यांनी केले पाहिजे. मी मांडलेली भूमिका सगळ्यांना पटलीच पाहिजे, असे माझे म्हणणे नाही. पण मी मांडलेली भूमिका चुकीची ठरवणारे ते कोण? माफी मागण्याइतका मी काय गुन्हा केलाय? किंवा अपशब्द वापरलाय? राज्यपाल, सत्ताधारी मंत्री आणि आमदारांनी बेताल वक्तव्य केली, अपशब्द वापरले, त्याबाबत कुणी बोलायला तयार नाही. यातून कारण नसताना वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करतात. हे बरोबर नाही. त्यांना त्यांची जी भूमिका मांडायची, ती त्यांनी मांडावी. आम्हाला जी भूमिका मांडायची, ती आम्ही मांडू. जनतेला जी भूमिका पटेल, त्या भूमिकेचे जनता स्वागत करेल, असे अजित पवारांनी रोखठोकपणे सांगितले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here