Sharad Pawar: ‘राष्ट्रवादी हा जातीयवादी पक्ष’ राज ठाकरेंच्या आरोपाला शरद पवारांचं प्रत्युत्तर

Sharad Pawar: …त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं

0

कोल्हापूर,दि.८: Sharad Pawar On Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भाजपाशी जवळीक वाढल्यानंतर त्यांनी अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप केला. याला आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “राष्ट्रवादीच्या जन्मानंतर या पक्षाचं नेतृत्व पहिल्यांदा छगन भुजबळ यांनी केलं, नंतर मधुकर पिचड यांनी केलं. ते कोणत्या समाजाचे होते हे सांगण्याची गरज नाही,” असं म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. ते रविवारी (८ जानेवारी) कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (Sharad Pawar News)

हेही वाचा Sharad Koli | तुम्ही शारिरीक वजन कमी केले, उरले-सुरलेले राजकीय वजन आम्ही संपवू: शरद कोळी

राज ठाकरे आरोप काहीही करू शकतात… | Sharad Pawar

शरद पवार म्हणाले, “राज ठाकरे आरोप काहीही करू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर या पक्षाचे नेते कोण होते याची नोंद पाहिली तर पहिलं नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे होतं. ते कुठल्या समाजाचे आहेत मी सांगण्याची गरज नाही. नंतरच्या काळात मधुकर पिचड होते. ते आदिवासी समाजाचे होते. अशा अनेक लोकांची नावं सांगता येतील.”

Sharad Pawar On Raj Thackeray
शरद पवार

…तर त्याची आम्ही दखल घेत नाही | Sharad Pawar News

“खरंतर ही नावं सांगण्याचीही गरज नाही, कारण हा विषय कधी आमच्या मनातही येत नाही. आम्ही सर्व शाहू-फुले-आंबेडकर विचाराचे लोक आहोत. त्यामुळे कोणी अशी टीका केली तर त्याची आम्ही दखल घेत नाही,” असं म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

…त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं | Sharad Pawar On Raj Thackeray

एखादी व्यक्ती सहा महिन्यात मत व्यक्त करते ते गांभीर्यानं घेण्यासारखं नाही. मला सकाळी उठल्यानंतर वृत्तपत्र वाचायची सवय आहे. त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं. अनेकजण वृत्तपत्रात काय लिहिलंय हे न वाचता वक्तव्य करत असेल तर मी त्यांना दोष देणार नाही, असा टोला शरद पवार यांनी मध्यंतरी राज ठाकरेंना लगावला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here