Maharashtra: रावसाहेब दानवेंनी सांगितले महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका कधी होणार

0

औरंगाबाद,दि.27: Maharashtra News: केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Elections) कधी होणार हे सांगितले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपचे दानवे यांनी वक्तव्य केलं आहे. दानवे यांनी आगामी लोकसभा (Lok Sabha Elections) आणि विधानसभा निवडणुकीबाबत (Vidhan Sabha Elections) मोठं विधान केलं आहे.

हेही वाचा Karnataka: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील या राज्याने घेतला हा निर्णय

काय म्हणाले रावसाहेब दानवे? | Maharashtra Political News

राज्यातील राजकीय (Maharashtra Politics) परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या देखील निवडणुका होणार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) फुलंब्री तालुक्यात नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात दानवे यांनी हे विधान केलं आहे.

पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील | Aurangabad News

भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना दानवे म्हणाले की, हल्लीची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. सोबतच राजकीय घडामोडी होऊन इतर औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला आहे. दानवे यांचे या विधानाने राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून मध्याविधी निवडणूक लागण्याच्या चर्चा सुरू असतानाच दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

जाहिरात

सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना सल्ले

फुलंब्री येथे आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी जोरदार फटकेबाजी केली. आपल्या राजकीय करियर बद्दल बोलताना दानवेंनी अनेक किस्से सांगितले. मात्र, याच वेळी गावातील राजकारण याबद्दल नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना अनेक सल्लेही दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here